इंडिया जनता न्युज सोबत राहा १ पाऊल पुढे
वृत्त :
कोरेगांव भीमा ता शिरूर येथील तलाठी कार्यालयात महिला तलाठी व मंडल अधिकारी यांच्या नावाने लाच घेताऱ्या त्यांच्या १ साथीदाराला लाच घेताना रंगेहात ताब्यात घेण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले . यामध्ये तलाठी महिला अश्विनी दत्तात्रय कोकाटे व निवृत्ती लक्ष्मण कानगुडे व अन्य १ अश्या तिघांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.
कोरेगाव भीमा ता शिरूर येथील १ तक्रार दाराला त्याच्या खरेदी केलेल्या जागेची ७ / १२ नोंद व जमीन वाटपाची नोंद करण्यासाठी तलाठी महिला अश्विनी कोकाटे यांनी स्वतःच्या व मंडलाधिकारी यांच्या साठी २०,००० रुपये लाच मागितली होती याबाबत सदर तक्रार दार व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती .
मतदान(VOTOR) नवीन व दुरुस्ती केली जाईल.
नवीन पॅनकार्ड फक्त ५ मिनिटात काढून मिळेल
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलीस स्टेशन शिक्रापूर येथे शुक्रवारी रात्री उशिरा कोरेगाव भीमाच्या तलाठी अश्विनी दत्तात्रय कोकाटे वय ३२ वर्ष रा रुद्र सोसायटी वाघोली ता हवेली जि पुणे व निवृत्ती लक्ष्मण कानगुडे वय २९ वर्ष रा आपटी ता हवेली जि पुणे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाच घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून मंडलाधिकारी मात्र फरार झाला असल्याचे समोर आले आहे
0 Comments