सौजन्य : जनता न्यूज
दिनांक : 19-May-21
जर आपला मित्र नातेवाईक खासगी कंपनी मध्ये काम करत असतील आणि त्यांचे PF कापून जात असेल तर आणि त्यांचे COVID 19 मृत्यू झाले असेल तर त्यांना 7 लाख रुपये चा क्लेम मिळतो
दिनांक : 19-May-21
सर्व कामगार बंधुंचे माहितीसाठी महत्वाची गोष्ट
आपला दर महिन्याला जो पीएफ घेतला जातो, त्यामध्ये आपल्या पीएफ वर्गणी बरोबरच कारखाना आपल्यासाठी वर्गणी भरत असतो. या दोन्ही मधुन काही भाग प्राव्हिडेंड फंड, फॅमिली पेंशन व अल्प हिस्सा हा ईडीएलआय (इन्शुरन्स) ला जात असतो.
दुर्दैवाने नोकरीच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या प्राव्हिंडेड फंडाच्या ऑफिस कडुन फंड, पेन्शन याच बरोबर सात लाख रुपयांपर्यंत विम्याची रक्कम मिळु शकते.
विम्याच्या रक्कमेचे कॅल्क्युलेशन खालील प्रमाणे केले जाते.
१. आपला पीएफ ला पात्र असणारा पगार (१५ हजारांहून अधिक असेल तर १५,०००/- धरला जातो.)
२. आपला जमा असलेल्या सरासरी फंडाच्या- ५०% (जास्तीतजास्त १,७५,०००/-)
३५ X पीएफ पात्र पगार + सरासरी फंडाच्या ५०%
म्हणजेच
३५ X १५००० + १,७५,००० = ७,००,०००/-
सर्वसाधारणपणे फंड व पेन्शनचे क्लेम केले जातात तथापि योग्य ती माहिती नसल्याने विम्याच्या रक्कमेपासुन कुटुंबीय वंचित राहतात.
यासाठी काही आपणास माहित असल्या पाहिजेत अश्या बाबी खालील प्रमाणे...
१. कर्मचाऱ्याची सर्व्हिस कमीत कमी १२ महिन्यांच्या पेक्षा जास्त असावी.
२. कर्मचाऱ्यांनी पीएफच्या पोर्टलवर आपले ई-नॉमिनी रजिस्टर करणे आवश्यक आहे.
३. आपला UAN नंबर व सदर विम्याची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली पाहिजे.
ईमर्जनसी ई पास काढून मिळेल 👈 अधिक माहिती साठी या वर क्लिक करावे
या बाबी जर पुर्ण असतील तर आपल्या पश्चात आपले कुटुंबीय पीएफ पोर्टलवर अत्यंत सोप्या असलेला ऑनलाईन फॉर्म भरु शकतात. फॉर्म व्यवस्थितपणे भरला असल्यास त्यांना ३० दिवसांत सदर विम्याची रक्कम मिळते.
तरी सर्व कामगार बंधुंना विनंती आहे की आपण वरील माहिती आपल्या सर्व कामगार बंधुंपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावा. पुढील काळ आणि वेळ कोणाच्या बाबतीत कशी असेल ते कोणालाही आज सांगता येणार नाही, तेंव्हा आपली माहिती अपडेट असणे खुप महत्वाचे असते...
- आमचे पेज इंडिया जनता न्यूज
0 Comments