वाहतूक पोलिसांनी विनाकारण गाडी अडवल्याच्या घटना आपण नेहमीच बघत असतो. त्यामुळे अनेकदा
वाहन चालक आणि वाहतूक पोलिस यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.
चौकाचौकांमध्ये पोलिस उभं राहून गाड्या अडवताना आपल्याला दिसून येतात.
गाडी अडवल्यानंतर वेगवेगळ्या कागदपञांची संबंधित पोलिस मागणी करतात आणि दिलेल्या कागदपञांमध्ये ञुटी शोधायला सुरुवात करतात.
अशातच जनतेला मोठ्या मानसिक ञास आणि भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलिस विनाकारण कोणतेही वाहन अडवू शकत नाही, तसे केल्यास पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येईल.
असा नवीन आदेश सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढला आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
विनाकारण गाडी थांबवून ञास देणाऱ्या पोलिसाला अधीक्षकांनी चांगलचं सुनावलं आहे.
जर विनाकारण कोणी वाहन थांबवलं तर त्याच्यावर कडक कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्गांवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर का.रवाई करावी.
नाकाबंदी करताना संबंधित पोलिस स्टेशन हद्दीमधील पोलिस ठाण्यात नोंदणी करून कंट्रोल रुमला त्याची माहिती देणे यापुढे
बंधणकारक असणार आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलिस अमलदार विनाकारण कोणत्याही गाडीला अडवून ञास देत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिस अधीक्षकांकडे येत होत्या.
त्यामुळे विनाकारण कोणत्या वाहनाला थांबवायचं असल्यास कंट्रोल रुमची परवानगी घेणं देखील बंधनकारक केलं आहे.
पोलिस अमलदारच्या या गैरवागणूकीमुळे हे पाऊल उचललं असल्याच तेजस्वी सातपुते यानी सांगितलं आहे.
परराज्यातील वाहने, दुचाकी, चारचाकी यांना जर पोलिसांनकडून विनाकारण काही ञास होत असेल, तर त्यांनी खालील दिलेल्या क्रमांकावर
आपली तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जनतेला केले आहे.
तसेच व्हॉट्सअप क्रमांकावरही फोटोद्वारे तक्रार नोंदविता येणार आहे.
तक्रार क्रमांक- 0217-2732000 , 0217-2732009
काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांमुळे पोलिस विभाग हा संपूर्ण बदनाम होत आहे,
त्यामुळे ही अंमलबजावणी गरजेची असल्याच अधीक्षकांनी सांगितलं आहे.
वरील संबंधित क्रमांकावर संपर्क केल्यानंतर तक्रारीमध्ये काही तथ्य आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असं तेजस्वी
यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना अजिबात सोडण्यात येऊ नये आणि कायदेशीर कडक कारवाई करावी असे आदेशही त्यांनी
पोलिसांना दिले आहेत.
सोलापूर पोलिस आता स्वत: खोटा चालक पाठवून संबंधित पोलिसांची उलट तपासणी करणार आहेत. त्यामुळे आता पोलिसी खाक्या दाखवून
जनतेची लूट करणाऱ्यांची खैर नाही, असं तेजस्वी सातपुते यांनी म्हणलं आहे.
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा
इंडिया जनता न्युज
कोणाला आपल्या व्यवसाय/वाढदिवस व इतर कोणत्याही गोष्टी साठी बातमी/जाहिरात करायची असेल तर. संपर्क 8208814042 , 7719060190
इंडिया जनता न्यूज वर कोणाचीही फ्री मध्ये अॅडवरटाजिंग केली जाणार नाही.याची खबरदारी घ्यावी.
रोज अॅडवरटाजिंग केली जाईल.
ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा
0 Comments