जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा:- 9623917685 . जनता सदगुरू कॉम्प्युटर आणि महा ई सेवा केंद्र - आधारकार्ड अपडेट सेंटर शिक्रापुर मलठण फाटा - आधारकार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून मिळेल शिक्रापूर महा ई सेवा केंद्र :- 8411854305 , 7719060190. जनता कॉम्प्युटर व्होलसेलर & ई सेवा केंद्र :- 8208814042.

Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईल साठी तरुणीवर जीव घेणा हल्ला

इंडिया जनता न्युज सोबत राहा १ पाऊल पुढे 



कॉटन ग्रीन शिवडी स्थानका दरम्यान धक्कादायक घटना. 

 मुंबई लोकलने प्रवास करताना मोबाइल चोरी होण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. यासाठी बऱ्याचदा लोकलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशांना टार्गेट केलं जातं. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये मोबाइल चोरांमुळे तरुणीला आपला जीव गमावावा लागला असता. कॉटन ग्रीन आणि शिवडी स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. सुदैवाने तरुणीला गंभीर इजा झालेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे.

  जनता एन्टरप्राईज 

नेमकं काय झालं –
परळची रहिवासी असणारी प्रगती सरफरे २० डिसेंबरला संध्याकाळी कामावरुन परतत होती. संध्याकाळी ७ ते ७:१५ दरम्यान तिने पनवेल ट्रेन पकडली. शिवडी स्थानकाला उतरणार असल्याने कॉटन ग्रीन स्थानकानंतर ती दरवाजात येऊन उभी राहिली. लोकल ट्रेन कॉटन ग्रीन आणि शिवडीच्या मधे असतानाच अचानक तिच्या हातावर जोरात फटका बसला आणि हातातला मोबाइल खाली पडला. प्रगतीला काही वेळासाठी काय झालं हे कळलंच नाही.

प्रगती शिवडी स्थानकावर उतरली तेव्हा आरडाओरडा सुरु झाला होता कारण लोकलमधील अजून एका मुलाचाही मोबाइल चोरीला गेला होता. यानंतर स्थानकावर उपस्थित आरपीएफ जवानांनी लगेचच घटना घडली त्या दिशेने धाव घेतली पण तोपर्यंत चोर तेथून पळून गेले होते.

प्रगतीचा पती सुशांतने लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या माहितीनुसार, “प्रगती आणि मी तक्रार करण्यासाठी पोहोचलो असता वडाळा स्टेशनला जाण्यास सांगण्यात आलं. घरात कोणी नसल्याने आम्ही आमच्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन वडाळा स्टेशनला पोहोचलो. अखेर दोन तासांनी आमची तक्रार नोंदवण्यात आली”.

 

“पोलिसांनी आम्हाला तुमचा मोबाइल मिळेल असंही सांगितलं. उद्या मोबाइल मिळेलही, मुद्दा तो नाही. मोबाइल काय उद्या पुन्हा पैसे कमावून घेऊ शकतो. पण या घटनेत माझ्या पत्नीचं काही बरं-वाईट झालं असतं तर त्याला जबाबदार कोण? कारवाई करण्यासाठी काही तरी अघटितच झालं पाहिजे असं काही आहे का? मोबाइलसाठी आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या नराधमांवर कडक कारवाई केली पाहिजे,” असं सांगताना सुशांतला भावना अनावर होत होत्या.



IMEI नंबर ब्लॉक

मोबाइल हरवल्यानंतर आपण अनेकदा मोबाइल गेला म्हणत सीम कार्ड ब्लॉक करतो. पोलीस तक्रार केल्याशिवाय नवीन सीम कार्ड मिळत नाही यामुळे तक्रार करणं अनिवार्य असतं. पण आता तुम्ही थेट आपला मोबाइल IMEI नंबरही ब्लॉक करु शकता. जेणेकरुन मोबाइल चोरीला गेला असला तरी तो निरुपयोगी असेल अगदी खेळण्यातल्या मोबाइलसारखा. दूरसंचार विभागाकडे तक्रार केल्यानंतर २४ तासांत तुमचा मोबाइल पूर्णपणे बंद होतो.
तक्रार कुठे करावी – https://ceir.gov.in/Home/index.jsp या लिंक वर क्लिक करा 

🪀  Whatsapp  वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा  इंडिया जनता न्युज 

कोणाला आपल्या व्यवसाय/वाढदिवस व इतर कोणत्याही गोष्टी साठी बातमी/जाहिरात करायची असेल तर.

संपर्क :8208814042 / 7719060190





ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी फॉलो , लाईक , शेअर , SUBCRIBE करा 

व्हाट्स अप नं  8411854305  /  8208814042

WebSite:
   Sadguru Maha E Seva Services  👈 क्लिक 

   Sadguru Shoe Shop Shikrapur  👈 क्लिक 

   Janata Enterprises Shikrapur 👈 क्लिक  

   Sadguru Enterprises 👈 क्लिक  

   Janata Digital Seva 👈 क्लिक  

   Janata Mall    Janata Shopping   👈 क्लिक 

    Just Dial              👈 क्लिक               

   Janata Business Card     👈  क्लिक 

Post a Comment

0 Comments