जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा:- 9623917685 . जनता सदगुरू कॉम्प्युटर आणि महा ई सेवा केंद्र - आधारकार्ड अपडेट सेंटर शिक्रापुर मलठण फाटा - आधारकार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून मिळेल शिक्रापूर महा ई सेवा केंद्र :- 8411854305 , 7719060190. जनता कॉम्प्युटर व्होलसेलर & ई सेवा केंद्र :- 8208814042.

Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री श्रम योगी आणि किसान मानधन योजना

India Janata News Latest Updates







 सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही पेन्शन योजना (पीएमएसवायएम) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूकदारास दरमहा काही रक्कम गुंतवावी लागते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ मार्च २०१९ रोजी गुजरातच्या गांधीनगरमध्ये योजनेची औपचारिक घोषणा केली होती. यासाठीची नोंदणी १५ फेब्रुवारीला सुरू झाली. ही योजना रोजंदारीवर काम करणाऱ्या आणि असंघटित क्षेत्रातल्या श्रमिकांसाठी आणण्यात आली.



या योजनेद्वारे वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा गुंतवणूकदारांना 3 हजार रुपयांच्या पेन्शनची हमी सरकार देते. या योजनेद्वारे गुंतवणूकदारास आयुष्यभर पेन्शन दिली जाते. 

या लेखामध्ये आपल्याला प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची वैशिष्ट्ये, लाभ कसा मिळवायचा, गुंतवणूक किती करावी लागेल अशा सर्व प्रकारची माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

हरवलेले पॅन, आधार, मतदान,  ड्राविंग कार्ड काढून मिळेल  स्मार्ट कार्डमध्ये 

Pradhan Mantri Shram Yogi Mandhan योजना वैशिष्ट्ये

  • आपल्याला वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत योगदान द्यावे लागेल, सरकार देखील तेवढेच योगदान देईल.
  • 60 वर्षे पूर्ण झाल्यावर आयुष्यभर 3 हजार रुपये पेन्शन मिळू शकेल.
  • आपल्या मृत्यूनंतर पत्नीला आजीवन दीड हजार रुपये मिळतील.
  • पत्नीच्या निधनानंतर कुटुंबासाठी निवृत्तीवेतन किंवा ठराविक रकमेची सुविधा नाही.




प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना लाभ

  1. या योजनेसाठी बचत बँक खाते अनिवार्य आहे.
  2. खाते उघडताना आपले वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. याशिवाय मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे.
  3. जे कामगार राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस), कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी भविष्य निधी संघटना योजना यासारख्या कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत समाविष्ट नाहीत आणि आयकरदारही नाहीत, असे लोक या योजनेत सहभागी होऊ शकतात.
  4. ग्राहकांसाठी मोबाईल फोन, आधार कार्ड असणे बंधनकारक आहे.



  1. या योजनेंतर्गत, ग्राहक जवळच्या जनता / सद्गुरू महा ई सेवा केंद्र शिक्रापूर 412208 कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) येथे भेट द्यावी लागेल. त्यानंतर आधार क्रमांक आणि बचत बँक खाते / जन-धन खाते क्रमांक वापरून पीएमएसवायएम नोंदणीकृत होऊ शकतात.
  2. LIC च्या सर्व शाखा कार्यालये, ईपीएफओ / ईएसआयसीच्या कार्यालये, सदस्यांना योजनेसाठी, त्यांच्या फायद्यांविषयी आणि त्यानंतरच्या प्रक्रियेसाठी सुविधा पुरविण्यास मदत करतील. 
  3. आपण नोंदणीसाठी जवळच्या जनता / सद्गुरू महा ई  सेवा केंद्र शिक्रापूर येथे जाऊन नोंदणी करू  शकता. स्वत:ची प्रमाणपत्रे आणि आधार क्रमांक या आधारे नाव नोंदणी असेल. तथापि कोणत्याही चुकीच्या घोषणेच्या बाबतीत योग्य दंड आकारला जाऊ शकतो.
  4. एलआयसी हे फंड व्यवस्थापक आणि पेन्शन पे आऊटसाठी सेवा प्रदाता असतील. जमा निधीचे व्यवस्थापन व देखरेख करण्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळावर राहील, जी माननीय केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणार आहे. 

  जनता सदगुरू एंटरप्राईज शिक्रापूर येथून ५००० रुपया पर्यन्त कोणतीही वस्तु खरेदी करा आणि मिळवा मोबाईल फोन फ्री फ्री किवा खाली दिलेल्या oh Yes ! IT's FREE या वर क्लिक करून खरेदी करा.   

ही ऑफर फेब्रुवारी  2026 पर्यन्तच आहे.

  

 
 

Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana Maharashtra

  • आपले वय 18 वर्षे असल्यास वयाच्या 60 व्या वर्षापासून 3 हजार रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा 55 रुपये गुंतवणे आवश्यक आहे.
  • जर आपण 29 वर्षांचे असाल तर 60 वर्षाच्या वयाच्या 3 हजार रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा 100 रुपये गुंतवावे लागतील.
  • जर तुमचे वय 40 वर्षे असेल तर वयाच्या 60 व्या वर्षापासून 3 हजार रुपयांच्या पेन्शनसाठी तुम्हाला दरमहा 200 रुपये गुंतवावे लागतील. 
कागदपत्रे : 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड 
  • बैंक पासबुक
  • पासपोर्ट साइज फोटो :- 2
  • मोबाइल नंबर 
जर तुम्ही एखाद्या महिन्याचे योगदान भरले नाही तर त्या रकमेबरोबर व्याज देखील द्यावे लागेल. त्यानंतर सामान्य पद्धतीने तुमचे योगदान सुरू होईल. जर या योजनेशी जोडले गेल्याच्या तारखेनंतर 10 वर्षांच्या आतमध्ये पैसे काढायचे असतील तर तुम्हाला तुमचे पैसे बचत खात्य़ाच्या व्याजदराप्रमाणे परत करण्यात येतील

1800 267 6888 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही योजनेची अधिक माहिती मिळवू शकता

 

  

📲आपल्या मोबाईल वर मोफत न्यूज अपडेट्स पुरवणारे 'इंडिया जनता  न्युज- डिजिटल न्यूजपेपर' नक्की जॉईन करा .

५०००० पेक्षा अधिक वाचक संख्या 

        👉  आमचे पेज इंडिया जनता न्यूज 

 
जनता न्यूजचे सर्व अपडेट्स ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नक्की फॉलो , लाईक , शेअर करा. 
   





Post a Comment

0 Comments