नमस्कार मित्रांनो , आज आपण PM Vishwakarma Yojana Maharashtra 2024 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात, काय आहे ही योजना. या योजनेअंतर्गत १ लाख रू. कर्ज मिळणार तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो? सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येयील इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 77 व्या झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये PM Vishwakarma Yojana Maharashtra या योजनेची घोषणा केली. देशातील कारागीर शिल्पकार तसेच इतर पात्र नागरिकांसाठी यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. आता या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची देखील मान्यता मिळालेली आहे. या योजनेचे पहिल्या टप्प्यातील बजेट 12000 करोड ते 14000 रुपये करोड इतके आहे.
PM Vishwakarma Yojana Maharashtra 2024
कारागिर शिल्पकारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केली जातील.
कुशल तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासह विद्यावेतन दिले जाईल.
सवलतीच्या व्याजदर आणि दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे.
प्रशिक्षितांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र प्रदान करणे.
लोहार, कुंभार, चांभार, धोबी, गवळी, माळी समाजाला याचा फायदा होईल.
विश्वकर्मा योजना योजनेचे उद्दिष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने आज 13,000 कोटी रुपये खर्चाच्या “पीएम विश्वकर्मा” या नवीन केंद्र सरकारी योजनेला, पाच वर्षांच्या कालावधीसाठी (आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28) मंजुरी दिली. हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्त-कलाकार आणि कारागिरांची गुरु-शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हस्त-कलाकार आणि कारागीरांच्या कामाचा दर्जा सुधारणे तसेच त्यांची उत्पादने आणि सेवा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवून, विश्वकर्मा, स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडले जातील, हे सुनिश्चित करणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे. दरवर्षी सुमारे पंधरा हजार नोकऱ्या उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आर्थिक वृद्धी आणि स्थिरता आणणे हा यामागचा हेतू आहे. रोजगार निर्मिती करणे याकडे ही योजना प्रोत्साहित करते.
Vishwakarma Yojana Maharashtra कर्जाचे टप्पे
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, हस्त-कलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल, तसेच 5% सवलतीच्या व्याज दराने पहिल्या टप्प्यात रु. 1 लाखपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात रु. 2 लाखपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल. त्याशिवाय, ही योजना कौशल्य श्रेणी सुधारणा, अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य, डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल. PM Vishwakarma Yojana Maharashtra
PM Vishwakarma Yojana प्रशिक्षण
काराकारागिरांना प्रशिक्षण देणे हे एक मुख्य उद्दिष्ट या योजनेचे आहे. त्यांना कुशल बनवणे हा त्यामागचा हेतू आहे. हे प्रशिक्षण शिकत असताना त्यांना विद्यावेतन म्हणजेच की stipend दिले जाणार आहे की जे रुपये पाचशे इतके असेल. तसेच प्रगतशील बनण्यासाठी विविध साधनांची खरेदी करण्यासाठी त्यांना रुपये पंधराशे इतकी रक्कम देखील दिली जाणार आहे.
योजनेसाठी कोण पात्र?
ही योजना देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील हस्त-कलाकार आणि कारागिरांना मदत करेल. पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश केला जाईल: (1) सुतार (2) होडी बांधणी कारागीर (3i) चिलखत बनवणारे (4) लोहार (5) हातोडी आणि अवजार संच बनवणारे (6) कुलूप बनवणारे (7) सोनार (8) कुंभार (9) शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट (दगड फोडणारे) (10) चर्मकार (पादत्राणे कारागीर) (11) मेस्त्री (12) टोपल्या/चटया /झाडू/ कॉयर साहित्य कारागीर (13) बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे (14) न्हावी (केश कर्तनकार) (15) फुलांचे हार बनवणारे कारागीर (16) परीट (धोबी) (17) शिंपी आणि (18) मासेमारचे जाळे विणणारे.
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
17 सप्टेंबर हा दिवस विश्वकर्मा जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे 17 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र सरकार ही योजना सुरू करणार आहे. अजून पर्यंत अधिकृत वेब पोर्टल किंवा तपशील वार माहिती केंद्र सरकारकडून प्रसिद्ध केलेली नाही. पुढील माहिती जशी प्रसिद्ध केली जाईल तेव्हा आम्ही देखील तुमच्यासाठी सर्व माहिती नक्कीच घेऊन येऊ. PM Vishwakarma Yojana Maharashtra
मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana Maharashtra 2024) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि उद्दिष्ट , ती योजना म्हणजे काय इत्यादी ,मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !
0 Comments