जनता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा:- 9623917685 . जनता सदगुरू कॉम्प्युटर आणि महा ई सेवा केंद्र - आधारकार्ड अपडेट सेंटर शिक्रापुर मलठण फाटा - आधारकार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून मिळेल शिक्रापूर महा ई सेवा केंद्र :- 8411854305 , 7719060190. जनता कॉम्प्युटर व्होलसेलर & ई सेवा केंद्र :- 8208814042.

Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यातील 'जीएमआरटी' मधील शास्त्रज्ञांनी ने शोधले हळूहळू फिरणारे न्यूट्रॉन तारे



पुणे  ,  India Janata News Latest Updates : अवकाशातील तार्‍यांच्या समूहातून पल्सार शोधणे शक्य नव्हते. ते पल्सार शोधण्याचे काम पुण्यातील 'जीएमआरटी' शास्त्रज्ञांनी केले आहे. हा शोध  लावण्यासाठी एक नवीन वेगळी 'अल्गोरिदम' प्रणाली विकसित केल्याने जे पल्सार शोधता आले नव्हते, ते शोधणे सोपे होणार आहे.



अवकाशात काही प्रचंड तारे त्यांचे अणुइंधन जाळतात आणि अखेरीस सुपरनोव्हा नावाच्या हिंसक स्फोटात कोसळतात. न्यूट्रॉन तारे नावाची कॉम्पॅक्ट शहराच्या आकाराची वस्तू स्फोट अवशेषांच्या मध्यभागी राहते.

न्यूट्रॉन तारे अत्यंत दाट असतात आणि त्यांच्यात विश्वात आढळणारे सर्वांत मजबूत चुंबकीय क्षेत्र सामावलेले असते. ते वेगाने फिरतात आणि किरण उत्सर्जित करण्यासाठी त्यांच्या रोटेशनमधून ऊर्जा काढण्यास सक्षम असतात, असा अनोखा शोध पुणे 'जीएमआरटी'च्या शास्त्रज्ञांनी केला. जीएमआरटी हाय रिझोल्युशन सदर्न स्काय (जीएचआरएसएस) सर्वेक्षणाद्वारे एनसीआरएच्या शास्त्रज्ञांच्या तंत्राने पूर्वी शोधलेल्या पल्सार डेटामधूनच दोन नवीन स्लो पल्सार शोधले आहेत.

सर्व कालावधी आणि रुंदीचे पल्सार समान कार्यक्षमतेने शोधण्यासाठी डिझाइन केलेल्या नवीन उत्कृष्ट अल्गोरिदममुळे, त्याच डेटामध्ये मागील शोध पद्धतींद्वारे दृष्टीस न आलेले हे पल्सार टीम शोधू शकली. महत्त्वाचे म्हणजे, कमी रुंदी असलेल्या पल्सारसाठी, नवीन शोध अल्गोरिदम पारंपरिक शोध तंत्रापेक्षा जास्त संवेदनशीलता प्रदान करीत आहे. या चमूने अपवादात्मकपणे कमी रुंदी असलेल्या दोन नवीन पल्सारची नोंद केली आहे, जी कदाचित मागील सर्वेक्षणांद्वारे दृष्टीस न आलेल्या पल्सारचा गट उघड करेल.



जेव्हा हे किरण निरीक्षकाच्या पलीकडे जातात, तेव्हा नियमित पल्सेसचा एक क्रम दिसतो आणि म्हणून त्यांना 'पल्सार' असे नाव दिले जाते. कालांतराने, रोटेशनल एनर्जी नष्ट झाल्यामुळे पल्सारचा वेग मंदावतो आणि त्याचा फिरण्याचा कालावधी मोठा होतो. असा अंदाज आहे, की जर हा कालावधी खूप मोठा असेल तर पल्सार यापुढे किरण उत्सर्जित करू शकत नाही.

संघाचे नेतृत्व करणारे एनसीआरएचे पीएच. डी. विद्यार्थी शुभम सिंग यानी एनसीआरए, युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर, यूके, नॅशनल नेव्हल लॅबोरेटरी, यूएस आणि वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी, यूएसमधील शास्त्रज्ञांसह अलीकडेच जुलै 2022 मध्ये अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये कार्यक्षम पध्दतीने पल्सार शोधण्याचे नवीन तंत्र प्रकाशित केले आहे.

  

📲आपल्या मोबाईल वर मोफत न्यूज अपडेट्स पुरवणारे 'इंडिया जनता  न्युज- डिजिटल न्यूजपेपर' नक्की जॉईन करा .

५०००० पेक्षा अधिक वाचक संख्या 

        👉  आमचे पेज इंडिया जनता न्यूज 

 
जनता न्यूजचे सर्व अपडेट्स ब्रेकिंग बातम्या व असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी नक्की फॉलो , लाईक , शेअर करा. 
   




Post a Comment

0 Comments