पीएम किसान योजनेत आता अनेक अटी आणि शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. जसे हप्ते वाढत आहेत तसे केंद्र सरकारचे नियम आणखी कठोर होत आहेत. त्यामुळे तुम्ही जर काही चुका केल्या असतील तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत ज्यांनी eKYC अपडेट केलं नाही त्यांना 12 व 13 हप्ता मिळणार नाही.
आता आणखी एक नियम केंद्र सरकारने लागू केला आहे. ज्यांची स्वत:ची शेती नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांच्या कागदपत्रांची आणि जमिनीची पडताळणी होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी मोदी सरकारने ही योजना सुरू केली. केंद्र सरकारची ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. नव्या वर्षात 13 वा हप्ता येईल अशी चर्चा आहे.
आतापर्यंत 12 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आले आहेत. जर तुम्ही अजून पर्यंत eKYC केली नसेल तर तुम्हाला pmkisan.gov.in अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. किंवा जवळच्या महा ई सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही eKYC करून घेऊ शकता.
अन्यथा पुढचा हप्ता खात्यात येणार नाही. जमिनीच्या नोंदींची पडताळणी केली नसेल तर ती तातडीने करून घ्या. त्या भागातील जिल्हा/ब्लॉकच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही ते करून घेऊ शकता.
कुठे करायची तक्रार ? शेतकरी हेल्पलाइन क्रमांक 155261/011-24300606 वर कॉल करू शकतात. येथे तुम्हाला तुमच्या हप्त्याचे अपडेट मिळेल. यासोबतच तुम्ही पंतप्रधान किसान योजनेच्या 18001155266 या टोल फ्री क्रमांकावर किंवा थेट हेल्पलाइन क्रमांक 011-23381092 वर संपर्क साधू शकता.
मित्रांना शेअर करा:
📲आपल्या मोबाईल वर मोफत न्यूज अपडेट्स पुरवणारे 'इंडिया जनता न्युज- डिजिटल न्यूजपेपर' नक्की जॉईन करा .
५०००० पेक्षा अधिक वाचक संख्या
👉 आमचे पेज इंडिया जनता न्यूज
0 Comments