India Janata News Latest Updates
शेतजमीन ज्याच्या नावावर आहे, त्याचा मृत्यू झाल्यास वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण, त्यासाठी शेतजमिनीवर वारस नोंद करावी लागते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्यांत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो.
तुमचा मोबाईल हरवल्यास अश्या प्रकारे ब्लॉक करा फोन पे , गूगल पे , पे टीएम
- 💁🏻♂ AU Small Finance Bank मध्ये आजच बचत खाते उघडण्यासाठी क्लिक करा.
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी 'ई-हक्क' प्रणाली विकसित केली आहे. ई-हक्क प्रणालीद्वारे शेतकरी घरबसल्या सात ते आठ प्रकारचे फेरफार मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. सातबारा उताऱ्यावर बोजा चढविणे, कमी करणे, नावाची दुरुस्ती, वारस नोंदी करणे, ई-करार करणे अशा सेवांसाठी अर्ज करता येतो. अर्जावरील कार्यवाही कुठपर्यंत आली, हे देखील तपासता येते. दरम्यान, तलाठ्याकडील अर्जावर कार्यवाही झाल्यानंतर १७ व्या दिवशी तो मंडलाधिकारी यांच्याकडे जातो. १८ व्या दिवशी नोंद करणे किंवा रद्द होतो. त्यासंबंधीचा अधिकार मंडलाधिकाऱ्यांना आहे.
१) सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in येथे सर्च करून '७/१२ दुरुस्तीसाठी ई- हक्क प्रणाली' अशी सूचना असते. त्याखालील https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर वे.
२) 'पब्लिक डेटा एन्ट्री' हे पेज उघडल्यावर 'Proceed to login'वर क्लिक करून आधी स्वत:चे ऑनलाइन खाते उघडा. त्यासाठी 'Create new user'वर क्लिक करून 'New User Sign Up'वर सुरवातीला स्वत:ची माहिती भरावी. त्यानंतर लॉग-इन डिटेल्समध्ये Username टाकून 'check availability' पर्यायावर क्लिक करून पासवर्ड टाका. मग Security Questionsमधील एका प्रश्नाचे उत्तर द्या.
३) त्यानंतर मोबाईल, पॅनकार्ड नंबर, ई-मेल, पिन कोड टाका. देश, राज्य, जिल्हा टाकल्यावर 'Select City'मध्ये गाव निवडा. त्यानंतर Address Detailsमध्ये घराची माहिती टाका. शेवटी कॅप्चा टाका आणि 'सेव्ह' म्हणा. त्यानंतर पेजखाली एक लाल अक्षरातील मेसेज दिसेल. त्यानंतर 'Back' बटणावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करा.
४) नोंदणी करताना टाकलेले यूझरनेम व पासवर्ड पुन्हा टाका. तसेच कॅप्चा टाकून लॉग-इन म्हणा. त्यानंतर 'Details'चे पेज उघडेल. त्याठिकाणच्या पर्यायावरील '७/१२ mutations'वर .
५) 'User is Citizen' आणि बँकेचे कर्मचारी असल्यास 'User is Bank'वर . एकदा यूझरचा प्रकार निवडल्यावर 'Process'वर , 'फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क'चे पेज ओपन होईल. तेथील माहिती भरल्यावर 'तलाठ्यांकडे ज्या फेरफारसाठी अर्ज करायचा तो वारस नोंद पर्याय निवडा. त्यानंतर वारस फेरफार अर्ज उघडेल.
६) सुरवातीला अर्जदाराची माहिती भरून 'पुढे जा'वर . त्यानंतर स्क्रीनवर अर्ज मसुदा जतन केल्याचा मेसेज येईल आणि त्यासमोर अर्ज क्रमांक असेल. मेसेजखालील 'ओके' बटनावर क्लिक केल्यानंतर मृताचे नाव किंवा खाते क्रमांक टाका, सातबारावरील खाते क्रमांक टाका. पुढे 'खातेदार शोधा'वर क्लिक करून मृताचे नाव निवडा.
७) त्यानंतर संबंधित खातेदाराचा गट क्रमांक निवडून मृत्यू दिनांक टाका. त्यानंतर 'समाविष्ट करा'वर क्लिक करून खातेधारकाच्या जमिनीची माहिती तेथे दिसेल. त्यानंतर अर्जदार हा वारसांपैकी आहे का? असा प्रश्न येईल. होय, नाहीपैकी योग्य पर्याय निवडून 'वारसांची नावे भरा'वर .
८) वारस म्हणून ज्यांची नावे लावायची आहेत, त्यांची माहिती भरा. त्यानंतर इंग्रजीत नाव लिहा आणि मग जन्मतारीख टाका. वय टाकल्यानंतर पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाका. पुढील माहिती भरून पोस्ट ऑफिस निवडा. त्यानंतर पुढील माहिती भरा.
९) पुढे मृतासोबतचे नाते निवडा व शेवटी 'साठवा' (सेव्ह) या पर्यायावर . त्यानंतर दुसऱ्या वारसाचे नाव नोंदवायचे असल्यास तेथील 'पुढील वारस'वर आणि पूर्वीप्रमाणेच माहिती भरा व 'साठवा'वर .
१०) वारसांची नावे भरल्यावर 'पुढे जा'वर आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करा. तसेच इतर कागदपत्रांमध्ये रेशनकार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या जमिनीचे '८-अ'चे उतारेही लागतील.
शपथपत्र व स्वयंघोषणापत्र जरुरीचे
एका कागदावर शपथपत्र लिहून ते अपलोड करावे. त्यात मृत व्यक्तीच्या सर्व वारसांची नावे, पत्ते नमूद करावेत. सर्व कागदपत्रे जोडल्यानंतर 'फाईल अपलोड' झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर एक स्वयंघोषणपत्र दिसेल. या पत्राखाली 'सहमत' (Agree) या पर्यायावर . त्यानंतर वारस नोंदीचा अर्ज तलाठी कार्यालयाकडे जाईल. तेथे त्या अर्जाची छाननी होऊन तो मंजुरीसाठी मंडलाधिकाऱ्यांकडे जातो. १८व्या दिवशी सात-बारावर वारसांची नावे लागतील.
📲आपल्या मोबाईल वर मोफत न्यूज अपडेट्स पुरवणारे 'इंडिया जनता न्युज- डिजिटल न्यूजपेपर' नक्की जॉईन करा .
५०००० पेक्षा अधिक वाचक संख्या
👉 आमचे पेज इंडिया जनता न्यूज
- 💁🏻♂ AU Small Finance Bank मध्ये आजच बचत खाते उघडण्यासाठी क्लिक करा.
0 Comments